S M L

अण्णा भडकले, भाजपला बजावणार नोटीस

Sachin Salve | Updated On: Jan 31, 2015 01:36 PM IST

46anna_on_jain31 जानेवारी : आतापर्यंत दिल्लीच्या लढाईपासून दूर असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आता त्यात उडी घेतलीये. भाजपने आपविरोधात एक कार्टून प्रसिद्ध केलं होतं त्यावरून अण्णांनी भाजपला नोटीस बजावली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध आप असा सामना रंगलाय. शुक्रवारी भाजपने आम आदमी पक्षाला डिवचण्यासाठी एक कॉर्टूनच प्रसिद्ध केलं. या कार्टूनमध्ये अण्णांच्या फोटोला हार घालण्यात आलाय. तर अरविंद केजरीवाल आपल्या मुलांची शपथ घेत आहे. अण्णांच्या फोटोला हार घातल्यामुळे अण्णांचे कार्यकर्ते नाराज झालेत आणि अण्णांच्या वतीने भ्रष्टाचार विश्वस्त न्यासाचे श्याम आसावा दिल्ली भाजपला नोटीस बजावणार आहेत. तसंच दिल्ली भाजपविरोधातही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. फक्त गुन्हा दिल्लीत की राळेगणला दाखल करणार याविषयी चर्चा सुरू आहे.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2015 01:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close