राज ठाकरेंचा हायटेक मंत्रा, 'स्काईप'वरून सांधणार संवाद

राज ठाकरेंचा हायटेक मंत्रा, 'स्काईप'वरून सांधणार संवाद

  • Share this:

raj thakre31 जानेवारी : जनसंपर्क वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या थेट समस्या जाणून घ्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हायटेक फंडा वापरण्याचा होण्याचा निर्णय घेतलाय. राज ठाकरे आता 'स्काईप' या व्हिडिओ कॉलिंगवरुन मनसेच्या विभागीय कार्यालयांशी संपर्क साधणार आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर पराभवानंतर राज ठाकरेंनी शुक्रवारी मुंबईत पहिल्यांदाच मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रत्येक निवडणूक काही शिकवून जाते, पराभवामुळे आम्ही हार मानत नाही. कार्यकर्त्यांनी आता आणखी जोमानं कामाला लागावं, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. तसंच पक्षात सर्वांसाठी आचारसंहिता तयार केली जात असल्याचंही ते म्हणाले. पक्ष सोडून जाणार्‍यांबाबत बोलणार नाही असंही त्यांनी सांगितलं. याचवेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी हायटेक निर्णय घेतलाय. राज ठाकरे यापुढे राज्याच्या प्रत्येक विभागातील समस्या जाणून घेण्यासाठी महिन्यातला एक दिवस ठरवून तिथल्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यासाठीच स्काईपचा आधार घेतला जाणार आहे.

Follow @ibnlokmattv

First published: January 31, 2015, 1:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading