मिरज दंगलीमागे षड्‌यंत्र - मुख्यमंत्री

मिरज दंगलीमागे षड्‌यंत्र - मुख्यमंत्री

7 सप्टेंबरमिरज दंगल पुर्वनियोजीत कट असल्याचं सांगत त्यामागे षड्‌यंत्र असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. यात आतापर्यंत 208 लोकांना अटक करण्यात आली असून, पोलिसांना या संदर्भात कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तणावग्रस्त मिरजमधला कर्फ्यू पोलिसांनी मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत वाढवला आहे. मिरजेतला कर्फ्यू सकाळी दिड तास शिथिल करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. ज्या मंडळांनी गणेश विसर्जनाची तयारी दाखवली त्यांना कर्फ्यू असूनही विसर्जनाची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, सांगलीमध्ये शिवसेना नेत्या निलम गोर्‍हे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याचबरोबर दिवाकर रावते आणि परशुराम उपरकर यांनीही ताब्यात घेतलं आहे. भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांना विमानाने कोल्हापूरला जाण्यास परवानगी न दिल्याने ते गाडीने सांगलीच्या दिशेने जात असताना लोणावळयाजवळ पोलिसांनी केला त्यांना अटकाव केला आहे.

  • Share this:

Tags:
First Published: Sep 7, 2009 03:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading