इंग्लंडपुढे 201 धावांचे लक्ष्य

इंग्लंडपुढे 201 धावांचे लक्ष्य

  • Share this:

fndsajhafu

30  जानेवारी : 'करो किंवा मरो' अशी परिस्थितीतही टीम इंडियाच्या फलंदाजांनी इंग्लंडसमोर आज (शुक्रवार) सरळ शरणागती पत्करली. इंग्लंडने धोनी ब्रिगेडला 200 धावांमध्ये गुंडाळले. इंग्लंडपुढे 201 धावांचे आव्हान आहे.

वन डेच्या या तिरंगी मालिकेत टीम इंडियाच्या आतापर्यंत एकदाही विजय मिळवण्यात यश आलेले नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध पर्थ येथील वाका मैदानावर सुरू असलेल्या हा सामना अत्यंत महत्त्वचा आहे.

अजिंक्य रहाणेची 73 धावांची एकाकी खेळी वगळता टीम इंडिया फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर सपशेल नांगी टाकली. भारताचे 8 गडी केवळ 97 धावांमध्ये बाद झाले. शिखर धवन आणि रहाणे यांनी 83 धावांची सलामी देत भारताला सकारात्मक पण संथ सुरवात करून दिली. मात्र, त्यांच्या गच्छंतीनंतर धोनी ब्रिगेडची अक्षरश: दाणादाण उडाली.

Follow @ibnlokmattv

First published: January 30, 2015, 1:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading