शिवसेना-भाजपच्या गृहकलहावर 'समन्वया'चा तोडगा

शिवसेना-भाजपच्या गृहकलहावर 'समन्वया'चा तोडगा

  • Share this:

bejp_meet_uddhav_thacakrey29 जानेवारी : शिवसेना सत्तेत सहभागी झाली खरी पण भाजपसोबत अजूनही धुसफूस सुरूच आहे. रामदास कदम यांच्या पाठोपाठ "आम्ही सत्तेत सहभागी झालो म्हणजे शेपटू घातलेलं नाही" अशी तोफच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर डागली होती. शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या या गृहकलहावर तोडगा काढण्यासाठी आता समन्वय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये यावर चर्चा झाली आहे.

शिवसेना आणि भाजपचा संसार पुन्हा एकदा नव्याने थाटला खरा पण गृहकलह आणखीही सुरू आहे. 'बाळकडू' सिनेमातल्या डायलॉगचा आधार घेत शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी दोन नंबरचे पैसे घेऊ नये आणि मराठी माणसांना मुंबईत स्वस्तात घरं द्यावी असा टोला कदम यांनी लगावलाय. तर कदम यांचं वक्तव्य दुर्देवी आहे. पण त्यांचं व्यक्तव्य मनोरंजक असंच आहे असा पलटवार एकनाथ खडसेंनी केलाय. एवढं पुरे की नाही तेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात भाजपला चांगलेच फैलावर घेतले होते. "राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी थोडी तडजोड केली. याचा अर्थ आम्ही शेपूट घातली, असा होत नाही, अशी सणसणीत चपराकच त्यांनी भाजपला लगावली होती. तसंच आम्ही कुठल्याही लाटेवर वाहत जाणारे ओंडके आम्ही नाही, असंही उद्धव म्हणाले होते. या वादावर तोडगा काढण्यासाठी आता समन्वय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी याबद्दल माहिती दिली.

Follow @ibnlokmattv

First published: January 29, 2015, 11:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading