आम्ही दबावाला बळी पडणार नाही !

आम्ही दबावाला बळी पडणार नाही !

  • Share this:

Mumbra news ibn lokmat29 जानेवारी : मुंब्रा परिसरातील जिहादला नकार देणार्‍या तरुणाला आयबीएन लोकमतनं आवाज दिल्यानंतर काही जण झुंडशाहीचा आधार घेऊन हे प्रकरणच दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढंच नाहीतर ही बातमी दाखवू नये, यासाठी आयबीएन लोकमतवर गुन्हाही दाखल करवून घेण्यात आलाय. पण आम्ही अशा दबावाला कदापिही बळी पडणार नाही. हे प्रकरण नेमकं आहे तरी काय आणि पोलिसही कशापद्धतीने दबावाच्या राजकारणाला बळी पडत आहेत.

ठाण्यातील मुंब्रा परिसरात जिहादला नकार देणार्‍या मुस्लीम तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आलीय. एवढंच नाही तर, या तरुणाची गाडीही फोडण्यात आलीय. जिहादसाठी स्थानिक इमाम आपल्यावर दबाव आणत होता. असा आरोप या पीडित तरुणानं केलाय.

जखमी युवक मोहम्मद शेख सांगतो, "मी खेळून घराकडे येत असताना सिटी कॉनव्हेंट शाळेजवळ मला काही मौलवी भेटले. त्यांनी मला पकडलं आणि तुला जिहादी करतो अशी गळ घातली. त्यानी माझ्यावर दमदाटी केली. मला लाठीने मारहाणही केली."

आरोपींच्या या झुंडशाही विरोधात या पीडित तरुणाची आई आणि बहीणदेखील ठामपणे उभी राहिलीय.

मोहम्मदची आई महजीब शेख म्हणते, "ही लोकं आमच्यावर दबाव टाकत आहे. पण मीही कुराण पठन केलंय मलाही सगळं माहित आहे. मी, सुन्नी आहे. ही लोक आम्हाला विनाकारण यात गोवण्याचा प्रयत्न करत आहे. येणार्‍या काळात मुंब्य्रात मुस्लिमांमध्ये वातावरण खराब करण्याचा डाव आखला जात आहे. यामागे कुणीही असो पण त्यांचे इरादे ठीक नाहीये."

मोहम्मदची बहिण महजबीन शेख सांगते, "ही लोकं दोन दिवसांअगोदर आमच्या कुणी नसतांना आली होती. तुझ्या वडिलांना, भावाला जिहादी करायचं. मी त्यांना विनंती केली पण तरीही त्यांनी जोरजोरात धिंगाणा घातला आणि तुझ्या वडलांना आणि भावाला जिहाद काय आहे ते दाखवतो अशी धमकीच दिली."

झुंडशाहीविरोधात आवाज उठवणार्‍या या धाडसी मातेची कहाणी आयबीएन लोकमतनं दाखवताच...आरोपींनी पुन्हा एकदा झुंडशाहीचा आधार घेतला आणि आयबीेएन लोकमतवरच धार्मिक भावना भडकावल्याचा कांगावा करत गुन्हाही दाखल करवून घेतला. दुदैर्वाची बाब म्हणजे स्थानिक पोलीसही या झुंडशाहीला बळी पडत आणि असं काही झालं नसल्याचाच कांगावा करत आहेत.

अतिरिक्त आयुक्त प्रतापसिंह पाटणकर म्हणतात, 'या प्रकरणाची आम्ही चौकशी केली. इथं कोणतंही जिहादविषयी शिक्षण दिलं जात नाहीये.'

मुंब्रा परिसरात खरंतर यापूर्वीही अतिरेकी कारवायांना खतपाणी घातल्याचं आढळून आलंय. पण मुस्लिम बांधवांंच्या एकगठ्ठा मतांवर डोळा ठेऊन काही स्थानिक राजकारणी मंडळी त्याकडे सोईस्कर डोळेझाक करत आली आहेत. आताही त्याच झुंडशाहीच्या मानसिकेतून आयबीेएन लोकमतवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण आम्ही सच्चा

पत्रकारितेचा घेतला वसा कदापिही खाली टाकणार नाही. आमच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी आम्ही या पीडित मुस्लीम महिलेच्या बाजून शेवटपर्यंत ठामपणे उभे राहणार आहोत.

एक जबाबदार प्रसारमाध्यम म्हणून आयबीएन लोकमत या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहे. या अन्यायाविरूद्ध लढताना काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक जिहादच्या नावाखाली मुंब्रावासियांच्या धार्मिक भावनाही भडकावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. म्हणूनच आमचं मुंब्रा वासियांना विनम्र आवाहन आहे की, अशा राजकीय षडयंत्रांना तुम्हीही अजिबात बळी पडू नका...आम्ही देखील आमची निर्भीड पत्रकारिता यापुढेही अशीच सरू ठेवणार आहोत.

==================================================================================

संबंधित बातम्या

जिहाद विरोधी तरूणाची व्यथा दाखवल्यामुळे IBN लोकमतवर गुन्हा दाखल

 

जिहादसाठी नकार दिला म्हणून युवकाला बेदम मारहाण

Follow @ibnlokmattv

First published: January 29, 2015, 9:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading