पंकज अडवाणीने जिंकली प्रोफेशनल बिलियर्ड्स चॅम्पियनशिप

7 सप्टेंबरभारताचा अव्वल बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणीने जागतिक प्रोफेशनल बिलियर्ड्स चॅम्पियनशिप जिंकली आहे. रविवारी उशिरा झालेल्या फायनलमध्ये अडवाणीने गतविजेत्या इंग्लंडच्या मार्क रसेलला 2030 विरुद्ध 1253 पॉइंट्सने हरवलं. बिलिअर्ड्स चॅम्पियनशिपला 139 वर्षांचा इतिहास आहे. आणि गीत सेठी नंतर ही स्पर्धा जिंकणारा तो दुसरा भारतीय बिलिअर्ड्सपटू ठरलाय. यापूर्वी 1992मध्ये गीत सेठीने चॅम्पियनशिप विजेतेपद पटकावलं होतं. 24 वर्षांच्या पंकज अडवाणीचं हे पहिलंच प्रोफेशनल विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने वर्ल्ड बिलिअर्ड्स चॅम्पियनशिप जिंकली होती. 2006 मध्ये दोहा इथं झालेल्या एशियाडमध्येही गोल्ड मेडल अडवाणीच्या नावावर आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2009 10:56 AM IST

पंकज अडवाणीने जिंकली प्रोफेशनल बिलियर्ड्स चॅम्पियनशिप

7 सप्टेंबरभारताचा अव्वल बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणीने जागतिक प्रोफेशनल बिलियर्ड्स चॅम्पियनशिप जिंकली आहे. रविवारी उशिरा झालेल्या फायनलमध्ये अडवाणीने गतविजेत्या इंग्लंडच्या मार्क रसेलला 2030 विरुद्ध 1253 पॉइंट्सने हरवलं. बिलिअर्ड्स चॅम्पियनशिपला 139 वर्षांचा इतिहास आहे. आणि गीत सेठी नंतर ही स्पर्धा जिंकणारा तो दुसरा भारतीय बिलिअर्ड्सपटू ठरलाय. यापूर्वी 1992मध्ये गीत सेठीने चॅम्पियनशिप विजेतेपद पटकावलं होतं. 24 वर्षांच्या पंकज अडवाणीचं हे पहिलंच प्रोफेशनल विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने वर्ल्ड बिलिअर्ड्स चॅम्पियनशिप जिंकली होती. 2006 मध्ये दोहा इथं झालेल्या एशियाडमध्येही गोल्ड मेडल अडवाणीच्या नावावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2009 10:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...