जयप्रभा स्टुडिओ हेरिटेज वास्तू कोणत्या आधारावर?,लतादीदींची याचिका

जयप्रभा स्टुडिओ हेरिटेज वास्तू कोणत्या आधारावर?,लतादीदींची याचिका

  • Share this:

lata_mangeshkar_45428 जानेवारी : कोल्हापूर येथील ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ ही हेरिटेज वास्तू म्हणून राज्य सरकारने घोषित केली आहे. पण, आता या राज्य सरकारच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी याबाबत याचिका दाखल केली असून कोणत्या आधारावर राज्य सरकारने हेरिटेज वास्तूमध्ये समावेशाचा निर्णय घेतला अशी विचारणा केलीये.

1944 साली भालजी पेंढारकर यांनी ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ खरेदी केला होता. या स्टुडिओत चित्रपट महर्षी व्ही.शांताराम, भालजी पेंढारकर यांनी विविध कलाकृती इथं घडवल्या होत्या. कालांतराने या स्टुडिओची मालकी लता मंगेशकर कुटुंबीयांकडे आली. दोन वर्षांपूर्वी लतादीदींनी हा स्टुडिओ विक्रीसाठी काढला होता. पण कोल्हापुरकरांनी याविरोधात कोर्टात धाव घेतली आणि निर्णयावर स्थगिती आणली. दुसरीकडे जयप्रभा स्टुडिओचा हेरिटेजमध्ये समावेश करण्यात आला. राज्य सरकारने याबाबत कोल्हापूर शहरातल्या हेरिटेज वास्तूंची अंतिम यादी पाठवण्याचा आदेश महापालिकेला दिला होता. पालिकेनं आदेशाचं पालन करत यादी सरकारक डे सुपूर्द केली. त्यावेळी सरकारी वकिलांनी तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या आदेशाची प्रत न्यायालयात सादर केली. आता मात्र, लतादीदींनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीये. राज्य सरकारनं कोणत्या अधिकारांचा वापर करुन ही वास्तू हेरीटेज म्हणून घोषित केलीये अशी विचारणा याचिकेद्वारे केलीये. त्याबाबत संबंधित कागदपत्रं याचिकार्त्यांना पुरावावेत असे आदेश मुंबई उच्च न्यायलायाने दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी 26 फेब्रुवारीला होईल.

Follow @ibnlokmattv

First published: January 28, 2015, 8:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading