विनायक निम्हण यांची 'घरवापसी', सेनेत केला प्रवेश

विनायक निम्हण यांची 'घरवापसी', सेनेत केला प्रवेश

  • Share this:

vinayak_nimhan_sena28 जानेवारी : काँग्रेसचे माजी आमदार विनायक निम्हण यांची आज (बुधवारी) 'घरवापसी' झाली. विनायक निम्हण शिवसेनेत दाखल झाले आहे.

निम्हण यांनी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर एका छोटेखानी कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी निम्हण यांना शिवबंधनाचा धागा बाधला.

निम्हण हे नारायण राणे यांचे समर्थक मानले जातात. निम्हण यांना शिवसेनेचं पुणे शहर प्रमुखपद देण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. त्याचबरोबर त्यांना विधानपरिषदेचं आश्वासनही देण्यात आल्याचं बोललं जातंय.

Follow @ibnlokmattv

First published: January 28, 2015, 6:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading