भारत-अमेरिका अणु करारामुळे दक्षिण आशियात अस्थिरतेचा धोका - सरताज अझीझ

भारत-अमेरिका अणु करारामुळे दक्षिण आशियात अस्थिरतेचा धोका - सरताज अझीझ

  • Share this:

Pakistan new

28 जानेवारी :   अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौर्‍या दरम्यान झालेल्या काही करारांमुळे प्रादेशिक अस्थिरता वाढण्याची शक्यता पाकिस्तानने व्यक्त केली आहे. यासंदर्भात संताप व्यक्त करताना पाकिस्तानने म्हटले आहे की, देशाच्या सुरक्षेसंदर्भातील हित पाहणे याचा संपूर्ण अधिकार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. भारत अमेरिकेदरम्यान झालेल्या अणु नागरी सहकार्य करारावरून संतापून पाकिस्तानने ही प्रतिक्रिया दिली.

अणु कराराचा दक्षिण आशियाच्या स्थैर्यावर विपरित परिणाम होईल असं राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र प्रकरणातील पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अजिज म्हणाले आहेत. अणु पुरवठादार देशांमध्ये भारताला सामिल करून घेण्यासाठी अपवाद केल्या जाण्यावरही पाकिस्ताने आक्षेप घेतला आहे.

अजिज यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत भारताच्या समावेशासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचाही विरोध केला आहे. 48 सदस्यांच्या एनएसजीचे सदस्यत्व मिळण्याची भारताची क्षमता असल्याचे ओबामा म्हणाले होते. पण अजिज मात्र भारताच्या समावेशासाठी नियमांमध्ये शिथिलता आणण्याच्या विरोधात आहेत. भारत पुरस्कृत दहशतवादाचा पाकिस्तान बळी ठरल्याचा पाकिस्तानकडून कांगावा केला जातं आहे.

या कराराचा दक्षिण आशियाच्या स्थैर्यावर विपरित परिणाम होईल. अणुपुरवठादार देशांमध्ये भारताला सामिल करून घेण्यासाठी अपवाद करण्याला पाकिस्तानचा विरोध आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमचं स्थान मिळू नये. जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतानं सुरक्षा परिषदेच्या ठरावांचं उल्लंघन केलंय. त्यामुळे सुरक्षा परिषदेत विशेष स्थान मिळण्यासाठी भारत अपात्र आहे.

Follow @ibnlokmattv

First published: January 28, 2015, 12:57 PM IST

ताज्या बातम्या