भजन संध्येत आयोजकांचा 'तमाशा'

Sachin Salve | Updated On: Jan 27, 2015 11:51 PM IST

भजन संध्येत आयोजकांचा 'तमाशा'

jalgaon bhajan27 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात लोकवर्गणीतून भजन संध्येच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या भजन संध्येतच आयोजकांनी गायिकेला लावणी गायला लावून स्टेजवर नाचायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर या गायिकेवर नोटाही उधळण्याचा धक्कादायक प्रकार घडला.

चोपड्यामध्ये श्रीराम यज्ञाच्या पूर्वसंध्येवर भजन संध्या आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. त्यातही महिलांची संख्या लक्षणीय होती. भजन संध्या ऐन रंगात आल्याचं पाहून आणि प्रेक्षकांकडून पैशांचा पाऊस पडताना पाहून गायिकेनंही प्रेक्षकांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. आयोजकांनी गायिकेवर नोटा उधळताना पाहून प्रेक्षकांतल्या महिला कार्यक्रम सोडून निघून गेल्या. या घटनेचे तालुक्यात पडसाद उमटत असून सगळीकडे त्याची निंदा होतेय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2015 10:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close