नदालला पराभवाचा धक्का, थॉमसकडून सरळ सेटमध्ये पराभूत

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 27, 2015 06:02 PM IST

नदालला पराभवाचा धक्का, थॉमसकडून सरळ सेटमध्ये पराभूत

r nadala27 जानेवारी : वर्ल्ड नंबर बॅडमिनटनपटू राफेल नदालला आज धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. ऑस्ट्रेलियन ओपनच्या क्वार्टरफायनलमध्ये वर्ल्ड नंबर 7 थॉमस बर्डिचनं वर्ल्ड नंबर राफेल नदालला सरळ सेटमध्ये पराभवाचा धक्का दिला.

आजच्या ओपन क्वार्टर फायनलमध्ये सुरुवातीपासूनच बर्डिचनं नदालची सर्व्हिस भेदत मॅचमध्ये आघाडी घेतली. पहिल्या सेटमध्येच दोन वेळा नदालची सर्व्हिस भेदत बर्डिचनं पहिला सेट 6-2 नं खिशात घातला. तर दुसर्‍या सेटमध्ये बर्डिचननं नदालला संधीच दिली नाही आणि दुसरा सेट 6-0 नं जिंकला. तिसर्‍या सेटमध्ये नदालनं कमबॅक करण्याचा नामी प्रयत्न केला. पण टायब्रेकमध्ये बर्डिचनं तिसरा सेटही 7-5 नं जिंकत मॅच खिशात घातली. नदालला पराभवाचा धक्का देत आता बर्डिचनं दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 27, 2015 06:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...