S M L

40 मिनिटांनंतर फेसबुक, इन्स्टाग्राम पुन्हा 'ऑनलाइन'

Samruddha Bhambure | Updated On: Jan 27, 2015 03:17 PM IST

40 मिनिटांनंतर फेसबुक, इन्स्टाग्राम पुन्हा 'ऑनलाइन'

27 जानेवारी : गेल्या काही तासांपूर्वी 'ऑफलाइन' झालेली फेसबुक आणि इन्स्टाग्राम या दोन्ही सोशल नेटवर्किंग साईट्स 40 मिनीटांनी पुन्हा सुरू झाल्या आहेत.

फेसबुकचा सर्व्हर आज सकाळी 11 वाजून 50 मिनीटांनी बंद पडला होता. या साईट्सवर जाण्याचा प्रयत्न केला असता 'Sorry something went wrong' असा संदेश होमपेजवर दिसत होता. भारतासह आशिया आणि अमेरिका खंडातील युझर्सनाही हाच संदेश येत होता. फेसबुकची सेवा बंद झाल्याची व्हॉट्सऍप आणि ट्विटरवर नेटिझन्स चर्चा करत होते. जावळपास एक तासाभरात या साईट्स पूर्ववत झाल्या. या क्रॅशमागील तांत्रिक कारणांविषयी अद्याप फेसबुककडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, 9 जून 2014 रोजी फेसबुकला अशा प्रकारे व्यत्यय आला होता. भारतामध्ये तब्बल 10 कोटींहून अधिक नेटिझन्स फेसबुकचा वापर करत आहेत.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2015 02:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close