संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी आणि अोबामा

 संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी आणि अोबामा

 • Share this:

25 जानेवारी : भारत आणि अमेरिकेच्या नव्या पर्वाला शानदार सुरूवात झालीये. भारतासाठी महत्वपूर्ण अशा अणुकराराच्या मुद्यावर अखेर अमेरिकेनं नरमाईची भूमिका घेतलीये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी अणुकराराच्या मुद्यावर कोणतही ठोस आश्वासन दिलं नाही पण गेल्या कित्येक दिवसांची कोंडी फुटली असून यावर आणखी चर्चा होणं गरजेचं आहे असं सांगत ओबामांनी सकारात्मक संकेत दिले आहे.

 modi and obama_press_conf

ओबामा आणि मोदी यांची संयुक्त पत्रकार परिषद

पत्रकार परिषदेत ओबामांच्या निवेदनातील ठळक मुद्दे

पंतप्रधान मोदींच्या ऊर्जा आणि महत्वाकांक्षेमुळे मी प्रभावित झालोय -ओबामा

ओबामांची रशियावर टीका, रशियाचं युक्रेनमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे -ओबामा

ओबामांनी निवेदनाची सुरुवात 'मेरा प्यार भरा नमस्कार' ने तर शेवट 'चले साथ साथ' अशी केला

मंगळवारी होणार्‍या 'मन की बात' कार्यक्रमाची मी वाट बघतोय -ओबामा

सुरक्षा परिषदेतल्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा -ओबामा

नरेंद्र मोदींचं नेतृत्व कणखर -ओबामा

प्रजासत्ताक दिनाला बोलावलं हा सन्मान -ओबामा

दोन्ही देशामधल्या व्यापारात 60 टक्क्यांची वाढ -ओबामा

दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाली पण आणखी चर्चा होईल -ओबामा

मॅडिसन स्केअरमध्ये मोदींचं बॉलिवूडच्या स्टार प्रमाणं स्वागत झालं -ओबामा

स्वागताबद्दल सर्वांचे आभार - ओबामा

'चाय पे चर्चे'ला बोलावल्याबद्दल धन्यवाद -ओबामा

ओबामांनी भाषणाची सुरुवात केली हिंदीतून...म्हणाले सर्वांना 'मेरा प्यार भरा नमस्कार'

=================================================================================

( हे पेज अपडेट होत असून अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी पेज रिफ्रेश करा किंवा तुमच्या किबोर्डवरील 'F5' हे बटन प्रेस करा)

=================================================================================

मोदींच्या निवेदनातील ठळक मुद्दे

दोन्ही नेत्यांमधल्या केमेस्ट्रीमुळे आम्ही तर जवळ आलोच पण वॉश्ग्टिंन आणि दिल्लीही जवळ आली -मोदी

बराक आणि माझ्यात मित्रत्वाचं नातं -मोदी

दोन्ही देशांचे संबंध हे नेत्यांच्या संबंधांवर अवलंबून असतात- मोदी

मोदींनी ओबामांचा केला मित्रत्वानं ऐकेरी उल्लेख

जागतिक मुद्यांवर ओबामांशी चर्चा - मोदी

दोन्ही देशांची मैत्री विश्वशांती - मोदी

आर्थिक क्षेत्रात जास्त सहकार्य व्हावं -मोदी

दहशतवादाला थारा नाही - मोदी

दहशतवादाचा जगाला धोका, दहशतवादाविरूद्ध दोन्ही देश लढणार -मोदी

संरक्षण क्षेत्रातही वाढ झालीय - मोदी

भारत अमेरिकेदरम्यान नागरी अणुकरार, पंतप्रधानांचे सकारात्मक संकेत

नागरी अणुकरार हा महत्वाचा मुद्दा गेल्या 4 महिन्यांपासून यावर चर्चा झाली -मोदी

दोन्ही देश नैसर्गिक मित्र असून ओबामांच्या भेटीनं नवीन उर्जा मिळाली -मोदी

प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव -मोदी

दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये वेगानं बदल होतोय -मोदी

ओबामांनी प्रजासत्ताक दिनाचं निमंत्रण स्विकारलं हा सन्मान -मोदी

दोन्ही देशांमध्ये नवा अध्याय सुरू होतोय -मोदी

===========================================================================

 ओबामा आणि मोदींमध्ये 'चाय पे चर्चा'

बराक ओबामा हैद्राबाद हाऊसमध्ये दाखल, द्विपक्षीय चर्चेला थोड्याच वेळात होणार सुरुवात

-राजघाटावर ओबामांनी बोधिवृक्षाचं रोपणं करुन दिला शांतीचा संदेश

- बराक ओबामा राष्ट्रपती भवनातून राजघाटच्या दिशेने रवाना, राजघाटवर महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळाचे घेणार दर्शन

 • गार्ड ऑफ ऑनर स्वीकारणे हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान - बराक ओबामा
 • सैन्याकडून गार्ड ऑफ ऑनर स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी आणि प्रणव मुखर्जी यांनी केले ओबामांचे स्वागत
 • लष्कराकडून बराक ओबामांना गार्ड ऑफ ऑनर
 • ओबामांचं राष्ट्रपती भवनात शाही स्वागत
 • ओबामांच्या सन्मानासाठी 21 तोफांची सलामी
 • अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा राष्ट्रपती भवनात दाखल
 • बराक ओबामांसाठी राष्ट्रपती भवनात सांस्कृतीक कार्यक्रमांचं आयोजन
 • बराक ओबामा आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची होणार भेट, दुपारी बारा वाजता राष्ट्रपती भवनात जातील ओबामा
 • बराक ओबामा आणि मिशेल ओबामा ITC मौर्य शेरटनकडे रवाना
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं बराक ओबामा आणि मिशेल ओबामांचे स्वागत
 • बराक ओबामांचं भारतात आगमन, पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर हजर
 •  ओबामांचे विमान विमानतळावर उतरले
 • भारतीय आणि अमेरिकेचे अधिकारी पालम विमानतळावर पोहोचले
 • पालम विमानतळावर काहीसे धुके, पण एअरफोर्स वनचे लँडिंग व्यवस्थित होण्याची आशा

================================================================================

मोदी-ओबामांनी घेतली गळाभेट

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा बहुचर्चित भारत दौरा आजपासून (रविवार) सुरू झाला असून, ओबामा यांचे सकाळी पावणे दहाच्या सुमारास दिल्लीतील पालम एअरपोर्टवर आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: प्रोटोकॉल तोडून ओबामा यांचे स्वागत केले. यावेळी या दोघांनी गळाभेट घेतली.

===============================================================================

दिल्लीत कडेकोड बंदोबस्त

अमेरिकेचा अध्यक्ष हा जगातील सर्वाधिक शक्तिमान व्यक्ती समजली जात असल्याने राजधानीला लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. ओबामांच्या सुरक्षेसाठी तब्बल 45 हजार सुरक्षारक्षक तैनात केले असून, 15 हजार सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. राजपथावरही दर अठरा मीटरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. राजधानीत अत्यंत कडक बंदोबस्त असल्याने ओबामा असण्याच्या तीन दिवसांच्या काळात शहर जवळपास बंद राहणार आहे. ओबामांची विशेष गाडी 'द बीस्ट' दिल्लीमध्ये आधीच दाखल झाली आहे. त्यांच्याबरोबर उद्या 40 प्रशिक्षित कुत्र्यांचे श्‍वानपथकही येणार असून, ते राजपथाची पुन्हा तपासणी करणार आहेत. ओबामा यांच्या आगमनावेळेस दिल्लीत धुके असल्यास जयपूर येथील विमानतळावरही एअर फोर्स वन उतरण्याची सोय केली आहे.

===============================================================================

आग्रा भेट रद्द

 प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपली आग्रा भेट रद्द केली आहे. सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांच्या निधनामुळे ते ताजमहाल पाहण्यास न जाता 27 तारखेला दिल्लीहून सौदी अरेबियाची राजधानी रियाधकडे रवाना होणार आहेत.

राजे अब्दुल्ला यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. सौदी अरेबिया आणि अमेरिकेचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे भारत दौरा थोडा आखूड करण्याचा निर्णय ओबामांनी घेतला आहे. आधीच्या नियोजनानुसार, 27 तारखेला सकाळी काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेऊन ओबामा ताजमहाल पाहण्यासासाठी रवाना होणार होते. मात्र, ते आता सकाळी भेटीगाठी झाल्यानंतर आग्रा येथे न जाता सौदी अरेबियाला नवे राजे सलमान यांना भेटण्यासाठी रवाना होणार आहेत. हा बदल अमेरिकेने भारताला कळविल्यावर तशा सूचना स्थानिक प्रशासनाला आणि सुरक्षा संस्थांना देण्यात आल्या आहेत.

==================================================================================

एक नजर टाकूयात ओबामांच्या कार्यक्रमावर..

25 जानेवारी

- बराक ओबामांचं मिशेल यांच्यासह आगमन

- ITC मौर्यामध्ये जातील

- ओबामांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवनात शाही स्वागत समारंभ

-राजघाटावर महात्मा गांधींना वाहणार आदरांजली

-हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींसह द्विपक्षीय संबंधांवर चर्चा

-मोदी - ओबामा पत्रकारांसाठी संयुक्त निवेदन करतील

-ITC मौर्यामध्ये परत येतील

-ओबामांसाठी राष्ट्रपती भवनात शाही जेवण

-26 जानेवारी- प्रजासत्ताक दिन

-बराक ओबामा ITC मौर्यामधून निघून राष्ट्रपती भवनात जातील

-प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून बराक ओबामा राजपथावर जातील

-प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर

-सीईओंसोबत गोलमेज चर्चेत सहभागी, पंतप्रधान मोदी

या चर्चेत असतील

-सीईओंसोबतच्या चर्चेनंतर बराक ओबामा सीईओंना संबोधित करण्याची शक्यता

-पंतप्रधानांच्या 7 RCR या निवासस्थानी रात्रीचं जेवण घेण्याची शक्यता

-27 जानेवारी

-बराक ओबामा ITC मौर्यामधून निघतील

-सिरी फोर्टच्या टाऊन हॉलमध्ये बराक ओबामा संबोधित करतील.

-त्यानंतरचा ताजमहलचा दौरा रद्द

-ओबामा दिल्लीहून सौदी अरेबियाला जाणार

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2015 06:30 PM IST

ताज्या बातम्या