आता मेट्रोचाही मेगाब्लॉक

  • Share this:

mumbai metro

22 जानेवारी :  मुंबईतील घाटकोपर-वर्सोवा या मेट्रो रेल्वमार्गावर येत्या 24 , 25  आणि26  जानेवारी रोजी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मेट्रो रेल्वे प्रशासनातर्फे गुरूवारी याबद्दलची माहिती देण्यात आली. त्यामुळे तीन दिवस सकाळी 5.30  ते 7.30  या वेळेत मेट्रोची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मेगाब्लॉकदरम्यान, मेट्रोच्या काही महत्त्वपूर्ण तांत्रिक बाबींची तपासणी आणि दुरूस्ती करण्यात येईल. त्यानंतर 27 जानेवारीपासून मेट्रो रेल्वे पुन्हा पहिल्याप्रमाणे मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल.

Follow @ibnlokmattv

First published: January 22, 2015, 7:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading