IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा श्रीनिवासन यांना दणका

IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा श्रीनिवासन यांना दणका

  • Share this:

M_Id_388591_N_Srinivasan

22 जानेवारी :  आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाने श्रीनिवासन यांना जोरदार दणका दिला आहे. श्रीनिवासन यांच्याविरोधात कोणताही आरोप सिद्ध होऊ शकला नाही असे सांगत सुप्रीम कोर्टाने श्रीनिवासन यांना क्लीन चिट दिली असली तरी त्यांना बीसीसीआयची निवडणूक लढवण्यास मज्जाव केला आहे. तर गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांचा बेटिंगमध्ये समावेश होता असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

2013 मध्ये आयपीएलच्या सातव्या पर्वातील झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मुदगल समितीच्या अहवालाद्वारे गुरुवारी निकाल दिला. सुप्रीम कोर्टाचे न्या. टी.एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील द्विसदस्यीय खंडपीठाचा 130 पानी निकाल आहे. हितसंबंध आड येऊ नयेत म्हणून आयपीएलच्या चौकशीमध्ये श्रीनिवासन यांनी हस्तक्षेप केला नाही असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. श्रीनिवासन टीमची मालकी स्वत:कडे ठेवू शकतात. पण त्यांना त्यासाठी बीसीसीआय किंवा टीम यापैकी एकाची निवड करावी लागेल असे कोर्टाने म्हटले आहे. आयपीएलचे सीईओ सुंदर रमण विरोधात चौकशी करण्याची गरज असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.

बीसीसीआयचं कामकाज खासगी नसून सामान्य लोकांप्रमाणे त्यांनाही कायदा लागू होतो, अशा शब्दांत यावेळी सुप्रीम कोर्टाने बीसीआयला फटकारले आहे. तसेच राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांना आयपीएलमधून बाद करण्याचा महत्त्वपूर्ण निकालही सुप्रीम कोर्टाने दिला. या संघांच्या शिक्षेविषयी निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने निवृत्त न्यायाधीशांची त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. तसेच आगामी सहा आठवड्यांमध्ये बीसीसीआयच्या निवडणुका घ्यावात असे निर्देशही कोर्टाने दिले.


Follow @ibnlokmattv

First published: January 22, 2015, 4:52 PM IST

ताज्या बातम्या