बंदी उठवली, आता हापूस निघाला युरोपला !

बंदी उठवली, आता हापूस निघाला युरोपला !

  • Share this:

hapus_yurop20 जानेवारी : अखेर युरोपकरांना हापूसची ओढ लागली असून युरोपियन युनियननं हापूस आंब्यावरची बंदी उठवली आहे. हापूससह इतर जातींच्या आंब्यावरची बंदीही मागे घेण्यात आल्यामुळे आंबा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळालाय. त्यामुळे यंदा हापूसची परदेशवारी निश्चित ठरलीये.

मागील वर्षी युरोपियन युनियनने मे महिन्यात आंब्यामध्ये अळई आढळल्यानं आंब्यासह चार भाज्यांवर बंदी घातली होती. त्यामुळे 25 हजार टन आंबा युरोपला जाऊ शकला नव्हता. आंब्यासह वांगी, कारली, अळू आणि पडवळ या भांज्यावरही बंदी घातली गेली होती. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने युरोपियन युनियनला या संबंधी विनंतीही केली होती. मात्र, तरीही आंबा काही परदेशी जाऊ शकला नव्हता. अखेरीस डिसेंबर 2014 मध्ये युरोपीयन युनियनच्या अधिकार्‍यांनी भारतात येऊन पाहणी केली होती. यासंबंधी लवकरच अधिकृत घोषणा केली जाईलं असंही सांगण्यात आलं होतं. अखेर आज युरोपियन युनियनने आंबा उत्पादकांना मोठा दिलासा दिलाय. आंब्यावरची बंदी उठवण्यात आलीये. त्यामुळे महाराष्ट्रातला हापूस आता युरोपात जाणार असल्यानं शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळालाय.

Follow @ibnlokmattv

First published: January 20, 2015, 7:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading