गुप्तधनासाठी आपल्याच नरबळीचा डाव तरूणीने उधळला

गुप्तधनासाठी आपल्याच नरबळीचा डाव तरूणीने उधळला

  • Share this:

satana20 जानेवारी : पैशाचा पाऊस पाडून देण्याच्या व गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने आई वडिलांना नादी लाऊन रात्री-अपरात्री तंत्र मंत्राद्वारे विचित्र पूजा आर्च्या करणार्‍या तांत्रिकांचा पर्दाफाश घरातील मुलीनेच केला एवढंच नाहीतर या मुलीने नरबळी देण्याचा डावही उधळून लावलाय. नाशिक जिल्ह्यातील घटना असून नंदिनी डामरे असं या धाडसी तरुणीचं नाव आहे. तिने तांत्रिकाचा डाव उधळवून लावत बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य तांत्रिक बंडू जगताप आणि त्याचा सहकारी नंदू यादव यालाही सटाणा पोलिसांनी केली आहे. अजूनही तीन आरोपी फरार आहेत.

सटाणा शहरातील एकलव्य नगराजवळील एका घरात ओंकार डामरे हे पत्नी व मुलांसह राहतात. या घरात गेल्या काही दिवसांपासून साल्हेर मुल्हेर भागतील 4 ते 5 भोंदू भगत पैशाचा पाऊस पाडून देण्याच्या व गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने गेल्या काही दिवसांपासून रात्री-अपरात्री तंत्र मंत्राद्वारे विचित्र पूजा आर्च्या करीत होते. यास ओंकार डामरे यांची मुलगी नंदिनी डामरे हिने विरोध करीत पोलिसांत तक्रार दिली आहे. सटाणा पोलिसांनी संबंधितांवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वय गुन्हा दाखल केला असून, या भोंदू भगतांचा शोध घेतला जात आहे.

धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार नरबळीचा होता हे तपासातून पुढे आलं. आठ कोटींच्या गुप्त धनासाठी नंदिनी डामरे हिचाच बळी देण्याचा घाट या भोंदूबाबाने घातला असल्याचे तक्रारदार नंदिनीचे म्हणणं आहे. या प्रकरणी मुलीचे वडील ओंकार डामरे, आई मालनबाई, व भाऊ राहुल या तिघांना पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणातील तथ्य पोलीस तपासून पाहत असून, नरबळीचा घाट घालणारा गोळ्वाड येथील भोंदू बाबा व त्याच्या 4 साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. अखेरीस आज या प्रकरणी मुख्य तांत्रिक बंडू जगतापला अटक करण्यात आलीये.

Follow @ibnlokmattv

First published: January 20, 2015, 5:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading