News18 Lokmat

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 20, 2015 03:59 PM IST

Devendra Fadnavis25220 जानेवारी : डाव्होस, स्वित्झर्लंड येथे 21 ते 24 जानेवारी दरम्यान होणार्‍या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीसाठी भारताच्या प्रतिनिधी मंडळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समावेश केला आहे.

स्वित्झर्लंडमधील डाव्होस येथे होणार्‍या 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या 45व्या बैठकीसाठी केंद्र सरकारच्या प्रतिनिधींमध्ये पंतप्रधान मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली, तसेच सीमांध्राचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांची निवड केली आहे. ही बैठक तीन दिवस चालणार असून बैठकीदरम्यान मुख्यमंत्री परदेशी उद्योजकांच्या भेटी घेणार आहे. महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी काही परदेशी कंपन्यासोबत यावेळी काही महत्त्वाचे करारही करणार आहेत. आज (मंगळवारी) मुख्यमंत्री रवाना होणार असून, 25 तारखेला मुंबईत परत येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या परदेश दौर्‍यांना बंदी केलेली आहे. त्यांच्या परदेश दौर्‍यांना परवानगी नाकारली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा परदेश दौर्‍यासाठी पंतप्रधान मोदी यांनी खास समावेश केला आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2015 11:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...