इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय

इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय

  • Share this:

England vs Inida

20 जानेवारी : तिरंगी मालिकेत  इंग्लंडने भारतावर 9 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. इयान बेल आणि जेम्स टेलर इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. तिरंगी मालिकेतील भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. भारताचा डाव अवघ्या 153 धावांत आटोपल्याने इंग्लंडला विजयासाठी 50 षटकांत 154 धावांचं आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा सलामीवीर मोईन अली अवघ्या 8 धावात माघारी परतला. मात्र त्यानंतर बेल आणि टेलरने दमदार अर्धशतकांची नोंद करत डाव सावरला.

त्याआधी टीम इंडियाची सुरुवात निराशजनक झाली. सलामीवर शिखर धवनने आजही खराब कामगिरी केली. धवन अवघी एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि भारताला सुरुवातीलाच धक्का बसला. त्यानंतर अजिंक्य रहाणेने संयमी फलंदाजी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण दुसर्‍या बाजूला विराट कोहली, सुरेश रैना स्वस्तात बाद झाले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी सामन्यावर पूर्णपणे आपली पकड निर्माण केली. रहाणेदेखील 33 धावांवर बाद झाला तर रायुडूने 23 धावा ठोकल्या. पहिले 5 फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर संयमी फलंदाजी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करणारा कॅप्टन धोनी देखील 34 धावांवर बाद झाला. धोनीपाठोपाठ अक्षर पटेल शून्यावर माघारी परतला. टीम इंडियाकडून स्टुअर्ट बिन्नीने सर्वाधिक 44 धावा केल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांना सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात यश आले. स्टिव्हन फिन याने भेदक गोलंदाजी करत 5 विकेट्स मिळवल्या. तर, जेम्स अँडरसनने 4 विकेट्स घेतल्या.


Follow @ibnlokmattv

First published: January 20, 2015, 3:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading