आर.आर.पाटील यांची प्रकृती स्थिर

  • Share this:

r r patil speech19 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून काळजीचं कारण नाही असं लिलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीनमध्ये स्पष्ट केलं आहे. तसंच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही हॉस्पिटलकडून करण्यात आलंय.

राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून लिलावती हॉस्पिटमध्ये कॅन्सरच्या निवारणासाठी उपचार सुरू आहेत. आबांची प्रकृती आता स्थिर असल्याचं हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दुपारच्या मेडिकल बुलेटीनमध्ये स्पष्ट केलं.

आबांवर रेडिएशन ट्रिटमेंट पूर्ण झाली आहे आणि किमोथेरपी ट्रिटमेंट सुरू आहे. आर.आर.पाटील यांच्याकडून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे काळजीचं कारण नाही असंही सांगण्यात आलंय.

तसंच मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लिलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन आबांच्या प्रकृतीची विचारपुस केली होती. आबांवर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू असल्यामुळे कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागलाय. सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन लिलावती हॉस्पिटलकडून करण्यात आलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2015 03:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading