ऑस्ट्रेलियाचा भारतावर 4 गडी राखून विजय

ऑस्ट्रेलियाचा भारतावर 4 गडी राखून विजय

  • Share this:

aus-inida

18 जानेवारी :   तिरंगी मालिकेत रंगतदार वनडे मॅचमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाने भारतावर 4 गडी राखून विजय मिळवला. भारताने दिलेले 268 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 49 षटकांमध्ये गाठला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिंचच्या 96 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा विजय मिळवला.

भारतीय फलंदाजांनी केलेल्या 268 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने केवळ दोन विकेट गमावत 200 धावांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे भारताचा पराभव होणार असे चित्र दिसत होते. पण त्यानंतर गोलंदाजांनी आणखी चार फलंदाजांना माघारी पाठवत सामन्याचे चित्र पालटवले. त्यामुळे अखेरच्या षटकांपर्यंत अगदी अटीतटीची लढत पाहायला मिळाली.

दरम्यान, सलामीवीर रोहित शर्माच्या दमदार शतकाच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर 268 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने 50 षटकात आठ गडी गमावत 267 धावा केल्या. आर. अश्विन आणि मो. शमी नाबाद राहिले.

भारताचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताला पहिल्याच षटकात धक्का बसला. भारताचा सलामीवीर शिखर धवन केवळ दोन धावा करून बाद झाला. त्यामुळे भारताची एक बाद सहा धावा अशी अवस्था झाली. यानंतर रहाणे 12 आणि विराट कोहली 9 धावा करून माघारी परतल्याने, भारताची अवस्था 3 बाद 59 झाली होती. पण त्यानंतर रोहितने भारताचा डाव सांभाळत सुरेश रैनाच्या साथीने धावा केल्या. रोहितने 109 चेंडूत शतक झळकावले तर दुसरीकडे रैनानेही संयमी अर्धशतक ठोकले. रोहित-रैनाने शतकी भागीदारी रचत, भारताची धावसंख्या दोनशेच्या घरात पोहोचवली. त्यानंतर एक फटका खेळण्याच्या नादात रैना 51 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार धोनी मैदानात आला. रोहितने 109 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. त्याने नऊ चौकार आणि चार षटकारांनी सजलेली 138 धावांची शानदार खेळी केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2015 05:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading