आघाडी सरकारला जनतेनंच ठोकून काढलं -मुख्यमंत्री

आघाडी सरकारला जनतेनंच ठोकून काढलं -मुख्यमंत्री

  • Share this:

cm fadanvis on ncp17 जानेवारी : 15 वर्ष राज्य करणार्‍या आघाडी सरकारने जनतेला केवळ आश्वासनं दिली आपली चूक लक्षात आल्यानंतर मराठा आरक्षणाला घाईघाईने मंजुरी दिली पण दुर्देवाने त्याला स्थगिती मिळाली. मराठा आरक्षणाबाबत दिशाभूल केल्यानं जनतेनं निवडणुकीत ठोकून काढलं अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली. ते मुंबईत बोलत होते.

राज्यामध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर बर्‍याच काही गोष्टी निदर्शनास आल्यात. आघाडी सरकारने घाईघाईने अध्यादेश काढून मराठा आरक्षणाला मंजुरी दिली. परंतु हे करत असताना याचं कायद्यात रुपांतर केलं असतं तर त्याला स्थगिती मिळाली नसती असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं. तसंच एका अध्यादेशावर स्थगिती देताना आणि कायद्यावर स्थगिती देताना खूप मोठा फरक पडत असतो असंही ते म्हणाले. तसंच, 15 वर्ष राज्य करणार्‍या सरकारने केवळ आश्वासनं दिली. जाता-जाता लक्षात आलं की, आता आपल्याला समाज ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. आपला पराभव अटळ आहे. हे लक्षात आल्यावर मराठा आरक्षणला मंजुरी देण्यात आली आणि श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला पण दुर्देवाने यावर स्थगिती आली अशी परखड टीका फडणवीस यांनी केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2015 09:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading