मेट्रो-3 चा मार्ग अखेर सुकर, विधानभवनासमोर उभारणार मुख्य स्टेशन !

मेट्रो-3 चा मार्ग अखेर सुकर, विधानभवनासमोर उभारणार मुख्य स्टेशन !

  • Share this:

mumbai metro17 जानेवारी : मुंबईकरांची रोजची होणारी वाहतूक कोंडी आणि लोकलमध्ये दाटीवाटीतून सुटका करण्यासाठी आता मेट्रो 3 चा मार्गही सुकर झाला आहे. कुलाबा, वांद्रे ते सीप्झ या मार्गावर नियोजित मेट्रो तीनचा मार्ग राजकीय पक्षांच्या समजदारीमुळे मोकळा झाला आहे. मेट्रो 3 चं महत्त्वाचं स्टेशन हे विधानभवनासमोर उभारण्यात येणार आहे.

मुंबई मेट्रोच्या यशानंतर मुंबईसाठी मेट्रो 2, 3 आणि मेट्रो 5 प्रकल्पांचं नियोजन करण्यात आलंय. मागील वर्षी ऑगस्टमध्ये तत्कालिन आघाडी सरकारच्या काळात मेट्रो 3 चं भूमिपूजन पार पडलं होतं.

मेट्रो तीनचं भूमिपूजन झालं खरं पण मेट्रोपुढील विघ्न काही संपली नव्हती. मेट्रोच्या तिसर्‍या टप्प्यात कुलाबा -वांद्रे ते सीप्झ (अंधेरी) या 32 किलोमिटरच्या मार्गावर विस्तार होणार आहे. पण या प्रकल्पाच्या पुढे सर्वात मोठा अडथळा होता राजकीय पक्षांच्या कार्यालयांचा.

पण आता मेट्रो तीनचा मार्ग सर्व राजकीय पक्षांच्या मदतीमुळे सुकर झाला आहे. या मेट्रोचं महत्त्वाचं स्टेशन हे विधानभवनासमोर येत असल्यानं त्याच्या मार्गात अनेक अडथळे येत होते. कारण आठ विविध राजकीय पक्षांची कार्यालये आणि 26 सरकारी कार्यालये मेट्रोच्या प्रस्तावित स्टेशन मार्गात येत असल्याने अडचण निर्माण झाली होती.

त्यामुळे या सर्व राजकीय पक्षांना एमएमआरडीएनं नोटीस बजावल्या होत्या. त्यावर आज अतिरिक्त मुख्य सचिवांच्या कार्यालयात सुनावणी झाली. तेव्हा सगळ्या राजकीय पक्षांनी आपली कार्यालये रिकामी करण्यास संमती दर्शवली आहे. त्यामुळे मेट्रो तीनच्या मार्गातला एक मोठा अडथळा दूर झालाय.

Follow @ibnlokmattv

First published: January 17, 2015, 8:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading