S M L

गळीत हंगामासाठी एफआरपी जाहीर, उसाला 2300 चा भाव

Sachin Salve | Updated On: Jan 16, 2015 11:00 PM IST

cane prots16 जानेवारी : 2015 -16 च्या गळीत हंगामासाठी उसाकरता एफआरपी जाहीर करण्यात आले आहेत. साडेनऊ टक्के उतार्‍यासाठी 2300 चा भाव मिळणार आहे. या वर्षी भावात 100 रुपयांनी वाढ होणार आहे. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 2500 रुपयांची मागणी केलीय. यंदाचा भाव 2200 रुपये असणार आहे.

ऊस दरासाठी 2500 रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आंदोलनं करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रात पेटलेलं आंदोलन हे राज्यभरात पसरलं. ठिकठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको, चक्का जाम आंदोलन केलं. एवढंच नाहीतर पुण्यातील साखर संकुलाची तोडफोड करून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पेटवलं. स्वाभिमानीच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने केंद्राकडे मदतीसाठी साकडं घालणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेणार आहे. मात्र, उसाच्या भावासाठी एफआरपी जाहीर कऱण्याची तयारी करण्यात आलीये. चालू वर्षात उसाला साडेनऊ टक्के उतार्‍यासाठी 2300 चा भाव मिळणार आहे. या वर्षी भावात 100 रुपयांनी वाढ होणार आहे. पण स्वाभिामानी शेतकरी संघटनेनं 2500 रुपयांची मागणी केलीये. केंद्राने यातून मधला मार्ग काढत यंदाचा भाव 2200 रुपये देणार आहे. त्यामुळे स्वाभिमानी या निर्णयावर काय भूमिका घेत हे पाहण्याचं ठरणार आहे.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2015 11:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close