पुन्हा पॅरिस!, ओलीसनाट्यानंतर दोघांची सुखरूप सुटका

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 16, 2015 09:35 PM IST

पुन्हा पॅरिस!, ओलीसनाट्यानंतर दोघांची सुखरूप सुटका

paris_16jan16 जानेवारी : दहशतवादी हल्ला, गोळीबार, अपहरणनाट्याने हादरलेली पॅरिसनगरी आज पुन्हा एकदा ओलीसनाट्यामुळे काहीकाळासाठी स्तब्ध झाली. पॅरिसच्या ईशान्येकडच्या उपनगरात बंदुकधारी व्यक्तींने दोन जणांना ओलीस ठेवलं होतं. मात्र काही तासानंतर पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आणि ओलिसांची सुखरूप सुटका केली.

पॅरिस शहरातील ईशान्येकडे असलेल्या एका पोस्ट ऑफिसजवळ एका बंदुकधारी व्यक्तीने दोन व्यक्तींना बंधक बनवलं होतं. बंदुकधारी व्यक्तीने दोन जणांना ओलीस ठेवल्याची माहिती कळताच पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेरा घातला. पोलिसांनी उत्तर पूर्वी भागातील कोलंब परिसर खाली केला. तसंच मागील घटनांतून खबरदारी घेत हेलिकॉप्टरही तैनात केलं होतं. अखेरीस या बंदुकधारी व्यक्तीने पोलिसांशी स्वतःहून संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आणि ओलिसांची सुखरूप सुटका केली. ही व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचा फ्रेंच मीडियानं दावा केलाय. दोन आठवड्यांपूर्वी दहशतवाद्यांनी 'चॉर्ली एब्दो' या साप्ताहिकाच्या कार्यालयावर हल्ला केला होता यात 12 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर दुसर्‍याच दिवशी एका मार्केटमध्ये दहशतवाद्यांनी 4 जणांना ओलिस ठेवून हत्या केली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी पॅरिसला लक्ष्य केलं अशी चर्चा रंगली होती.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2015 09:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...