S M L

'त्या' पोरक्या बछड्यांना आईच्या भेटीची आस

Sachin Salve | Updated On: Jan 15, 2015 11:44 PM IST

'त्या' पोरक्या बछड्यांना आईच्या भेटीची आस

nanded_bibtya15 जानेवारी : आपल्या आईपासून दूर झालेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना त्यांच्या आईकडे सुखरूप पाठवण्याचं मिशन वनविभागाने हाती घेतलंय. ही दोन्ही बिबट्‌याची बछडे अवघे 15 दिवस ते 20 दिवसांचे आहेत. ही दोन्ही बछडे ज्या ठिकाणी आढळली होती त्या ठिकाणी सोडून देण्यात आली असून आता आई आणि या बछड्यांच्या भेटीची सर्वजण वाट पाहून आहे.

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात पारडी गावातील एका शेतात बुधवारी रात्री गावकर्‍यांना बिबट्याची दोन पिल्लं आढळली होती. सुरुवातीला ही मांजरीची पिल्लं असावी असा समज गावकर्‍यांचा झाला होता. मात्र, ही पिल्लं बिबट्याची कळल्यावर गावकर्‍यांना चांगलीच धडकी भरली. गावकर्‍यांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांना फोन करून याची माहिती दिली. उसाच्या शेतात ही पिल्लं आढळली. ही दोन्ही पिल्ले अवघे 15 दिवस ते 20 दिवसांची आहेत. वनविभागाने या परिसरात तळ ठोकालाय. परिसरात पिल्ले आढळ्ल्याने मादी आणि नर बिबटया देखील परिसरात असल्याचा वन विभागाचा दावा आहे. या पिलांना परत त्यांच्या आईकडे कसे पाठवता येईल याचा प्रयत्न वनविभागाने सुरू केलाय. ज्या शेतात ही पिल्ले आढळली त्या शेतात वनविभागाच्या अधिकार्‍यांनी या पिल्लांना सावधगिरीनं बाळगुन सोडुन दिले आहे. लवकरच त्यांची आई पिल्लांना सुरक्षित ठिकाणी नेईन असा विश्वास वनाधिकार्‍यांनी व्यक्त केला. दरम्यान, बिबट्याच्या वावरामुळे पारडी आणि आसपासच्या गावातील लोकांमध्ये भितीच वातावरण आहे. बिबट्याच्या भीतीने शेतात जायला देखिल गावकरी घाबरत आहेत. या आधी बिबट्याने गावातील अनेक शेळ्या, मेंढ्या, आणि कुत्र्यांनाही आपली शिकार बनवलंय. पिल्लांना परत सोडण्याएवजी या पिल्लांना पिंजर्‍यात ठेऊन त्या मादी बिबट्याला पकडायला हवे होते आणि त्यांची रवानगी इतरत्र किंवा प्राणी संग्राहलयात करायला हवी होती अशी मागणी गावकर्‍यांनी केलीये.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2015 11:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close