दमणगंगेचं पाणी गुजरातकडे वळवण्याचा घाट ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 15, 2015 08:10 PM IST

दमणगंगेचं पाणी गुजरातकडे वळवण्याचा घाट ?

damnganga_nashik15 जानेवारी : महाराष्ट्रात पुन्हा पाण्यावरून वादंग उभं राहिलंय. पण यावेळी ते कोणत्या दोन विभागांमध्ये नाहीये, तर महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असा वाद निर्माण झाला आहे. नदीजोड प्रकल्पाद्वारे महाराष्ट्राचं पाणी गुजरातकडे वळवायचा घाट केंद्र सरकारनं घातलाय. त्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत.

नाशिक जिल्ह्यातलं दमणगंगा पिंजाळ, पार-तापी, नर्मदा या 2 नदीजोड प्रकल्पांद्वारे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचं हक्काचं पाणी गुजरातकडे वळवलं जातंय. नाशिक जिल्ह्याअंतर्गत गोदावरी खोरं आणि गिरणा खोरं जास्त तुटीची आहेत. दमणगंगा,नार-पारचे पाणी, गिरणा खोर्‍यातील चांदवड, मनमाड, नांदगाव, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यांना मिळणं आवश्यक आहे. राज्याच्या हक्काचं पाणी जाऊ नये यासाठी हे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं. असा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांची समिती नेमण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच सर्वपक्षीय लढा देण्याचा इशाराही देण्यात आला. विशेष म्हणजे या आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले. त्यामुळे भविष्यात पाण्याचा वाद आणखी चिघळण्याची चिन्हं निर्माण झाली आहे.

काय आहे हा वाद ?

- नाशिक जिल्ह्यातली दमणगंगा नदी गुजरातमध्ये समुद्राला मिळते

- पाणीवाटपाबद्दल महाराष्ट्र-गुजरात यांचा करार

Loading...

- अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना 2010 मध्ये झाला होता करार

- दोन्ही राज्यांनी आपापल्या वाट्याचं पाणी घेण्याचा निर्णय

- गुजरातनं नियोजन करून घेतलं पाणी

- महाराष्ट्राचं नियोजन नाही

- उरलेलं पाणीही गुजरातकडे वळवण्याची शक्यता

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2015 08:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...