मुख्यमंत्र्यांच्या घराजवळच दोन महिन्यात दुसरा खून

मुख्यमंत्र्यांच्या घराजवळच दोन महिन्यात दुसरा खून

  • Share this:

nagpur_muder343413 जानेवारी : नागपूरच्या धरमपेठ परिसरातील वेस्ट हायकोर्ट रोडवर भरदिवसा रितेष भैसारे या तरुणाचा खून करण्यात आला. रितेश भैसारे या 29 वर्षाच्या तरूणाचा खून करून आरोपी फरार झाले आहेत.

या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतील घराजवळच ही घटना घडली आहे.

गेल्या महिन्यात याच परिसरात सागिर सिद्दिकी या कोळसा व्यापार्‍याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

 

Follow @ibnlokmattv

First published: January 13, 2015, 8:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading