मुंबईच्या वाहतूक कोंडीवर तोडगा, 3 उड्डाणपुलांना मंजुरी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 13, 2015 06:44 PM IST

मुंबईच्या वाहतूक कोंडीवर तोडगा, 3 उड्डाणपुलांना मंजुरी

mumbai342343413 जानेवारी : मुंबई आणि परिसरासाठी पायाभूत सुविधा उभारण्याच्या प्रस्तावांना एमएमआरडीएनं मंजुरी दिलीये. ईस्टर्न फ्री वे आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरून येणार्‍या वाहनांमुळे चेंबूरच्या छेडानगरला होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी समांतर फ्लायओव्हर, ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी सायन फ्लायओव्हर,नवी मुंबईतून ठाण्याच्या दिशेने येण्यासाठीही फ्लायओव्हर ठाणे-कल्याण-भिवंडी भागातील वाहतुकीसाठी प्रकल्प अहवाल यांचा यात समावेश आहे.

राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांच्या अध्यक्षतेखाली 'एमएमआरडीए'च्या कार्यकारिणी समितीची सोमवारी बैठक झाली. यात मुंबई आणि परिसरातील विविध प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. मुंबई महानगर प्रदेशासाठी दोन फ्लायओव्हर, वाहनांसाठी भुयारी मार्ग आणि दोन प्रकल्पांचा सविस्तर अहवाल तयार करण्यास मंजुरी देण्यात आली. तसंच बहुप्रतिक्षित मुंबईची एसी लोकल येत्या दोन महिन्यात एसी धावणार आहे.

वाहतूक कोंडीवर उपाय

- ठाणे-बेलापूर रस्त्यावर घणसोली नाका, तळवली नाका इथं1.4 किमीचा फ्लायओव्हर

- सविता केमिकल नाका इथं 600 मीटरचा फ्लायओव्हर

Loading...

- महापे जंक्शन इथं ठाणे-बेलापूर 500 मीटरचा भुयारी मार्ग

- शीळफाटा-महापे रस्त्यावर एल अँड टी जंक्शन इथं फ्लायओव्हर

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2015 06:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...