IBN लोकमत इम्पॅक्ट : 'त्या' कुटुंबाला वाळीत टाकणार्‍या तिघांना अटक

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 13, 2015 05:27 PM IST

IBN लोकमत इम्पॅक्ट : 'त्या' कुटुंबाला वाळीत टाकणार्‍या तिघांना अटक

chandadgad13 जानेवारी : कोल्हापुरातील चंदगडमध्ये पार्ले गावातल्या गुरव कुटुंबाला वाळीत टाकल्याप्रकरणी अखेर 3 जणांना अटक करण्यात आलीये. गेल्या दोन वर्षांपासून गावानं वाळीत टाकलंय. आयबीएन लोकमतने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस प्रशासनने अखेर दखल घेतलीये.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पार्ले गावात गुरव कुटुंबाला दोन वर्षांपासून वाळीत टाकण्यात आलंय. गुरव कुटुंबाला गावातल्या दुकानात जायलाही बंदी आहे. त्यांची पिठाची गिरणीही गिर्‍हाईक नसल्यानं बंद झालीये. तर गुरव यांच्याशी बोलल्यामुळे देसाई कुटुंबालाही वाळीत टाकण्यात आलं आहे. केवळ जातपंचायतीच नाही तर खेडोपाडी असणार्‍या गावकीच्या सत्ताही कायदा हातात घेऊन एखाद्याच जगण मुश्कील करताना दिसताहेत. बिन विरोध होणारी ग्राम पंचायतीची निवडणूक लढविली आणि गावातील देऊळ बांधण्यास विरोध केला म्हणून "पार्ले" च्या गुरव कुटुंबाला गावानच वाळीत टाकलंय. या कुटुंबाकडून कुणी बोलल्यास दोन हजार, शेतात कामाला गेल्यास पाच हजार दंड आणि या हुकुमाच पालन न केल्यास त्यालाही वाळीत टाकण्याचा अलिखित आदेश गावातील पंचानी काढला. लहान मुलाला एक चॉकलेट आणण्यासाठी ही एक किलोमीटरवर असलेल्या मोटनवाडी या गावात जाव लागतंय. याच सगळ्या गोष्टीना वैतागून बाळकृष्ण गुरव यानी चंदगड पोलिसांत गावातील 60 जनाविरोधात आपणास वाळीत टाकल्याची फिर्याद दिलीये. मात्र, पंचानी या सगळ्या आरोपांचा इन्कार केलाय. या प्रकरणाची वाचा आयबीएन लोकमतने फोडल्यानंतर पोलीस प्रशासनाने कारवाई करत आता तीन जणांना अटक केलीये.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2015 05:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...