चार्ली हेब्दोतील व्यंगचित्र छापणार्‍या जर्मनीतील वृत्तपत्रावर हल्ला

चार्ली हेब्दोतील व्यंगचित्र छापणार्‍या जर्मनीतील वृत्तपत्रावर हल्ला

  • Share this:

5443c41db2fd5d2c8324e86cd9a26608d142ca79

11 जानेवारी :  फ्रान्समधील चार्ली हेब्दो या साप्ताहिक मासिकातील व्यंगचित्र छापल्याने जर्मनीतील एका वृत्तपत्राच्या प्रिटिंग प्रेसवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसले तरी हल्लेखोरांनी ज्वलनशील पदार्थ फेकल्याने प्रेसमधील काही महत्त्वपूर्ण कागदपत्र जळून खाक झाली.

फ्रान्समधील चार्ली हेब्दो या साप्ताहिकाच्या पॅरिसमधील ऑफिसवर गेल्या आठवड्यात दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 10 पत्रकार आणि 2 पोलिस अधिकार्‍यांचा मृत्यू झाला होता. चार्ली हेब्दोमध्ये 2011 मध्ये पैगंबराचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित झाले होते आणि याच्या निषेधार्थच हा भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता. चार्ली हेब्दोमधील हे वादग्रस्त व्यंगचित्र जर्मनीतील वृत्तपत्रांनीही छापले होते. याप्रकरणी जर्मनी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. हा हल्ला चार्ली हेब्दोचे व्यंगचित्र छापल्याने झाला असून पोलिसांनीही त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 11, 2015 04:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading