बेकायदेशीर प्रार्थनास्थळं पाडण्याचे हायकोर्टाचे आदेश

  • Share this:

dg55mumbai_High-Court09 जानेवारी : 29 सप्टेंबर 2009 नंतरची अनधिकृत प्रार्थनास्थळं पाडण्याचा महत्वपूर्ण आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. सोसायटी फॉर फास्ट जस्टिसनं या संदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत. 5 मे 2011 च्या राज्य शासनाच्या निर्णयानुसार हा आदेश देण्यात आला आहे.

अनधिकृत प्रार्थनास्थळं प्रकरणी 2011 च्या निर्णयाचं पालन होत नसल्यामुळे याचिका दाखल करण्यात आली होती. या निर्णयानुसार पालिका प्रशासन आणि राज्य सरकार अनधिकृत प्रार्थनास्थळांविरोधात कारवाई करत असल्याचं कागदोपत्री दाखवत होते पण प्रत्यक्ष कोणतीही कारवाई होत नव्हती ही बाब याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर नाराजी व्यक्त करत कोर्टाने या संदर्भात राज्यभरातल्या संबंधित महापालिका आयुक्तांनी यासंबंधीचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर करावं असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. राज्यभरात मिळून एकंदरित 17 हजार 614 तर मुंबईत 741 अनधिकृत प्रार्थनास्थळं आहेत. सगळ्यात जास्त अनधिकृत प्रार्थनास्थळं पिंपरी चिंचवड भागात आहेत. अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई करताना संबंधित यंत्रणांना पोलीस सुरक्षा पुरवण्याचा आदेश हायकोर्टाने दिला आहे.

Follow @ibnlokmattv

First published: January 9, 2015, 8:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading