फडणवीस सरकारचा दणका, 8 भ्रष्ट अधिकार्‍यांची मालमत्ता होणार जप्त

फडणवीस सरकारचा दणका, 8 भ्रष्ट अधिकार्‍यांची मालमत्ता होणार जप्त

  • Share this:

corrupt_@#4213509 जानेवारी : भ्रष्ट अधिकार्‍यांना चाप लावण्यासाठी फडणवीस सरकारने कठोर निर्णय घेतलाय. आठ भ्रष्ट अधिकार्‍यांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला मंजुरीही दिली आहे. त्यामुळे बाबुशाहीला चांगलाच दणका बसलाय.

भ्रष्टचाराने पोखरलेल्या यंत्रणेला कारणीभूत ठरणार्‍या बाबूशाहीला आवर घालण्यासाठी फडणवीस सरकारने पाऊल उचलले. राज्यातील वेगवेगळ्या प्रकरणातील आठ भ्रष्ट अधिकार्‍यांवर राज्य सरकारने आता चांगलाच आसूड ओढलाय. आठ भ्रष्ट अधिकार्‍यांची कोट्यवधीची माया आता जप्त होणार आहे. भ्रष्ट अधिकार्‍यांच्या संदर्भातली फाईल मुख्यमंत्र्यांनी आठवड्याभरात क्लिअर केलीय. या निर्णयामुळे भ्रष्ट अधिकार्‍यांना बचक बसू शकेल. रायगडचे उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर यांची 143 कोटींची मालमत्ता यात जप्त होईल. सोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दादाजी खैरनार यांच्यासोबतच भाऊसाहेब आंधळखरे, अशोक माने, विजयकुमार बिराजदार, पंढरी कावळे, विनोद नखाते, दिनेश पोद्दार या भष्ट अधिकार्‍यांची मालमत्ता जप्त करण्यात येईल.

Follow @ibnlokmattv

First published: January 9, 2015, 1:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading