संजूबाबा तुरुंगात गेलाच नाही, आला तसा घरी परतला

संजूबाबा तुरुंगात गेलाच नाही, आला तसा घरी परतला

  • Share this:

sanjay_dutt_back mumbai08 जानेवारी : चौदा दिवसांची रजा (फर्लो) संपवून संजय दत्त येरवडा तुरुंगात पोहचला खरा पण वाढीव रजेच्या मागणीवरुन घोळ निर्माण झाल्यामुळे संजूबाबा जेलमध्ये न जाता आपल्या मुंबईतील घरी पोहचलाय. संजय दत्तला वाढीव सुट्टी देण्यात आली आहे की नाही यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे.

1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी संजय दत्त पुन्हा एकदा जेलबाहेर आला. 14 दिवसांच्या फर्लो रजेवर संजय दत्त जेलमधून न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बाहेर पडला. पण 14 दिवसांची फर्लो संपत असताना पुन्हा एकदा संजूबाबाने वाढीव सुट्टीचा ड्रामा सुरू केला. 14 दिवसांचा फर्लो संपून आज संजय दत्त येरवडा जेलमध्ये हजर राहणं अपेक्षित होतं. त्यासाठी तो पुण्यात पोहोचलासुद्धा पण येरवडा जेलमध्ये हजर झाला नाही. संजय दत्तनं फर्लोमध्ये आणखी 14 दिवसांची वाढ करण्याची विनंती केलीय. पण त्याचा अर्ज मंजूर झालाय की, नाही याबद्दल कुणाकडेही ठोस माहिती नाही. आयबीएन लोकमतनं याबद्दल जेल प्रशासनाशी संपर्क साधला. पण त्यांच्याकडेही ठोस माहिती नव्हती. संजय दत्तचा फर्लो मंजूर झाला नाही आणि जर संजय दत्त जेलमध्ये हजर झाला नाही, तर एकोणतीसाव्या दिवशी कारवाईला सुरवात करू असं अधिक्षक योगेश देसाई यांनी सांगितलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2015 11:44 PM IST

ताज्या बातम्या