चार्ली हेब्दो हल्ल्याप्रकरणी 2 संशयित हल्लेखोरांचा ठावठिकाणा लागला

चार्ली हेब्दो हल्ल्याप्रकरणी 2 संशयित हल्लेखोरांचा ठावठिकाणा लागला

  • Share this:

ParisShooting suspects08 जानेवारी : पॅरिस दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दोन संशयितांचा ठावठिकाणा लागला आहे. फ्रान्सच्या उत्तर भागातल्या एइस्ने विभागात लपल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोन संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी कूच केलीय. मात्र पॅरिस आज पुन्हा दहशतवादी हल्ल्यानं हादरलंय. या प्रकरणी आतापर्यंत 7 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय.

पॅरिसमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणातल्या एका हल्लेखोराने शरणागती पत्करली आहे. तर 7 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. हेमंड मोर्राड असं शरणागती पत्करणार्‍या अतिरेक्याचं नाव आहे. तो फक्त 18 वर्षांचा आहे. इतर दोन अतिरेकी सईद कवाची आणि शेरीफ कवाची यांचा शोध सुरू आहे. येमेनी अतिरेक्यांशी या दोघांचा संबंध असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केलाय. हल्ल्याच्या तपासात अमेरिकेनंही मदत देऊ केलीये. बुधवारी पॅरिसमध्ये चार्ली हेब्दो या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या ऑफिसवर बेछूट गोळीबार झाला. संपादकांची बैठक सुरू असताना हा हल्ला करण्यात आला. त्यात 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 9 पत्रकार आणि 2 पोलिसांचा समावेश आहे. या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये साप्ताहिकाचे मुख्य संपादक आणि कार्टुनिस्ट यांचाही समावेश आहे. मात्र आज दुसर्‍या दिवशी पुन्हा पॅरिस दहशतवादी हल्ल्याने हादरली. गेल्या 24 तासांत पॅरिसमध्ये 3 दहशतवादी हल्ले झाले आहे. आज पॅरिसच्या दक्षिण भागात एका अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केलाय. या गोळीबारात 1 पोलीस जखमी झालाय. या गोळीबारानंतर हल्लेखोराने लॉयन भागातील रेस्टॉरंटमध्ये स्फोट घडवून आणलाय. दरम्यान, या हल्ल्यातून खच्चून न जाता चार्ली हेब्डो पुढच्या आठवड्यात पुन्हा सुरू होणार आहे असं चार्ली हेब्डोच्या संपादकीय विभागाने स्पष्ट केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2015 08:41 PM IST

ताज्या बातम्या