मुलीची भूतबाधा दूर करतो सांगून भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार

मुलीची भूतबाधा दूर करतो सांगून भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार

  • Share this:

nagar rape08 जानेवारी : मुलीची भूतबाधा दूर करतो असं सांगून एका विवाहित महिलेवर भोंदूबाबाने दीड महिना बलात्कार केल्याची खळबळजनक घटना भिवंडीमध्ये घडलीये. या प्रकरणी भोंदूबाबा प्रभाकर पाटील याला अटक करण्यात आलीये. न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.

घडलेली हकीकत अशी की, पीडित महिला ही अंबाडी नाका परिसरात आरोपी भोंदूबाबा प्रभाकर पाटील याच्या घरी घरकाम करण्यासाठी दिनांक 20 नोव्हेंबरपासून जात होती. पीडित महिलेची 8 वर्षांच्या मुलीस लहानपणापासून फिट येते. त्यावर आपल्या गरिबीमुळे उपचार करू न शकल्याने पीडित महिलेच्या असह्यातेचा फायदा घेत आरोपीने तिचा पती कामानिमित्त जळगाव येथे गेला असताना तुझ्या मुलीवर मी उपचार करेन परंतु त्यासाठी तू मुलीला घेवून माझ्या घरी अमावस्येचा दिवशी रात्री यावे लागेल असं सांगितलं. त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून पीडित महिला त्याच्या घरी 22 नोव्हेंबरला गेली असता सुरुवातीला काही मंत्र पुटपुटत, ध्यानस्थ होत उपचार केल्याचा बहाणा करून मुलगी झोपी गेल्यावर पीडित महिलेवर आरोपीने बलात्कार केला. त्यानंतर हा प्रकार दीड महिने सुरू होता. पण मुलीची भूतबाधा काही दूर झाली नाही.

Follow @ibnlokmattv

First published: January 8, 2015, 4:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading