तिसर्‍या दिवसअखेर टीम इंडिया 5 बाद 342

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 8, 2015 02:16 PM IST

तिसर्‍या दिवसअखेर टीम इंडिया 5 बाद 342

KL rahul

08 जानेवारी : कर्णधार विराट कोहलीची 140 धावांची नाबाद खेळी आणि लोकेश राहुल याचे शतक (110) याच्या जोरावर तिसर्‍या दिवसाअखेर भारताने 5 गडी गमावत 342 धावा केल्या आहेत. टीम इंडिया अजूनही 230 धावांची पिछाडीवर असली तरी तिसरा दिवस विराट कोहलीच्या नावावर राहिला.

विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेसा खेळ करत आणखी एक शतक ठोकले असून या मालिकेतील त्याचे हे चौथे शतक आहे. त्यापूर्वी लोकेश राहुलने कसोटीतील पहिले शतक फटकावत रोहित शर्माच्या साथीने (53) भारताचा डाव सावरला. शर्मा बाद झाल्यानंतरही त्याने कर्णधार विराट कोहलीला चांगली साथ दिली. मधल्या फळीतील फलंदाज रहाणे (13) आणि रैना (0) पटापट बाद झाल्याने भारताला धक्का बसला. दिवसाअखेर कोहली आणि सहा खेळत आहेत.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2015 01:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...