पॅरीसमध्ये दहशतवादी हल्ला, 12 जण ठार

पॅरीसमध्ये दहशतवादी हल्ला, 12 जण ठार

  • Share this:

paris_attack07 जानेवारी : फ्रान्सची राजधानी पॅरिस दहशतवादी हल्ल्याने हादरलीये. पॅरिसमधील 'चार्ली हेब्दो' या साप्ताहिकाच्या कार्यालयावर एका बंदूकधारी तरूणाने हल्ला चढवला आणि अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले आहे. मृतांमध्ये 9 पत्रकार आणि 2 पोलिसांचा समावेश आहे. हा हल्ला का करण्यात आला याचे कारण आणखी स्पष्ट झाले नसून हल्लेखोरांची माहिती मिळू शकली नाही.

पॅरिसमधील 'चार्ली हेब्डो' या साप्ताहिकाच्या कार्यालयात घुसून बंदूकधारी तरुणांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. हल्लेखोर तरुणांनी त्यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. हल्लेखोर काळ्या रंगाचे मुखवटे घालून आले होते. या हल्ल्यानंतर फ्रान्सचे राष्ट्रपती ओलांदे यांनी हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचा सांगितलं. ओलांदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या हल्ल्यात 12 लोकांचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी आहेत अशी माहिती दिली. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर पॅरिसमध्ये सुरक्षा वाढवण्यात आलीये. ज्या साप्ताहिकावर हा हल्ला करण्यात आला ते साप्ताहिक व्यंग साप्ताहिक असून अलीकडेच या साप्ताहिकाने दहशतवादी संघटना आयसीसचा म्होरक्या अबु-बकर-अल-बगदादी यांचं कार्टून छापलं होतं.

साप्ताहिकाबद्दल...

- चार्ली हेब्दो हे साप्ताहिक उपहासात्मक लिखाणासाठीच ओळखलं जातं

- या साप्ताहिकात छापून येणारी कार्टून्सही बोचरी असतात

- 2011मध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबरांचं वादग्रस्त कार्टून छापल्यामुळे हल्ला होता

- अलीकडेच आयसीसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीचं कार्टून छापलं होतं

- कार्टूनमध्ये बगदादीला चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 7, 2015 06:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading