आता मुंबई पालिका !, भाजपने हाती घेतलं 'मिशन 100'

आता मुंबई पालिका !, भाजपने हाती घेतलं 'मिशन 100'

  • Share this:

bjp_on_mumbai municipal corporation05 जानेवारी : विधानसभा काबिज केल्यानंतर आता भाजपने आपला मोर्चा मुंबई महापालिकेकडे वळवला आहे. भाजपने महापालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी 'मिशन 100' मोहीम हाती घेतलीये. 2017 च्या महापालिका निवडणुकीत 100 नगरसेवक निवडून आण्यासाठी भाजपने तयारीही सुरू केलीये.

देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी भाजपने आता मोर्चेबांधणी सुरू केलीये.2017 ला मुंबईत होणार्‍या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 100 नगरसेवक निवडून आणण्याच्या तयारीला भाजप लागली आहे. याच तयारीला मिशन 100 असं नाव देण्यात आलं आहे. शिवसेनेचे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या 'मिशन 151' प्रमाणे आता भाजपनेही महानगरपालिका निवडणुकांमध्ये 100 नगरसेवकांचं टार्गेट ठेवलं आहे. त्याच्या जोरदार तयारीला भाजप लागलंय. सध्या मुंबई महानगर पालिकेत भाजपचे 29 नगरसेवक आहेत, ही संख्या वाढवून 100 वर नेणे यासाठी भाजपनं विविध पक्षातल्या 30 ते 35 आजी माजी नगरसेवकांची यादी तयार केली आहे. ज्यांना निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल. जिंकून आलेल्या 15 आमदारांच्या आघाडी मिळवलेल्या 60 वार्डांवर लक्ष केंद्रीत करणे आणि मुंबई महानगरपालिकेतील 227 पैकी किमान अर्ध्या जागांवर दावा करणं अशी रणनीती भाजपने आखली आहे. विशेष म्हणजे महापालिकेवर सेनेची गेल्या 17 वर्षांपासून सत्ता आहे. शिवसेना सत्तेत जरी सहभागी झाली असली तरी महापालिकेच्या रणसंग्रामात शिवसेना भाजप आमनेसामने येतील असे चिन्ह दिसत आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 5, 2015 11:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...