भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी दानवेंच्या नावावर शिक्कामोर्तब ?

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी दानवेंच्या नावावर शिक्कामोर्तब ?

  • Share this:

ravosaheb_danve302 जानेवारी : भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून अखेर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. आज (शुक्रवारी) मुंबईत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. लवकरच दानवे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची औपचारिकता बाकी आहे.

विधानसभा निवडणुकीपुर्वीच जालन्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा केला होता. अखेर त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवलाय. रावसाहेब दानवे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडलीये. प्रदेशाध्यक्षपद आपल्याला मिळावे यासाठी रावसाहेब दानवे यांनी दिल्ली दरबारी वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन जाहीरपणे दावाही केला होता. विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद रिक्त झाले. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी कुणाची निवड होणार याची चर्चा सुरू झाली. पण मंत्रिमंडळाचा विस्तार, सेनेच्या सत्तेत सहभागामुळे प्रदेशाध्यक्षपदाची निवड लांबणीवर पडली. अखेर आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत आले असता प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा झाली. यावेळी दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. रावसाहेब दानवे सध्या केंद्रात राज्यमंत्री आहेत. ग्राहक हक्क, अन्न आणि नागरी पुरवठा खातं त्यांच्याकडे आहे. रावसाहेब दानवे हे मंुडे गटाचे मानले जातात. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपद निवड करण्यात आलीये.

Follow @ibnlokmattv

First published: January 2, 2015, 8:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading