Elec-widget

कार, लिफ्ट आणि निर्घृण हत्या !

कार, लिफ्ट आणि निर्घृण हत्या !

  • Share this:

vasai_car_lift_muder02 जानेवारी : वसई, विरार सह मुंबई, ठाणे,परिसरात महामार्गावर एकटा प्रवास करणार्‍या वाहनचालकाला लिफ्टचा बहाणाकरुन त्यांच्या गाडीत बसून वाहनचालकाचे अपहरण करणे, धारदार हत्याराने वार करुन ठार मारणे आणि ज्या गाडीत लिफ़्ट घेतली ती गाडी पळवून नेणे अशा सराईत टोळीचा वालिव पोलिसांनी पर्दाफाश केला असून चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. चारही आरोपींनी तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून तिघांचाही या चारजणांनी निर्घृणपणे खून केला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

अटक करण्यात आलेल्या चारही गुन्हेगारांनी गेल्या वर्षभरात धुमाकूळ घातला. मागिल वर्षात 13 जानेवारी रोजी मुंबई माऊंटमेरी येथील संजीतलाल चंदरलाल देव (वय 36) यांच्यावर धारदार हत्याराने वार करुन, गळा कापून व हातपाय बांधून वसई पुर्वेकडील धुमाळनगर येथे जखमी अवस्थेत फेकुन दिले होते. देव यांची गोल्डन रंगाची टोयोटा कंपनीची ईनोव्हा गाडीही पळवून नेली होती. याचा वालिव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तसंच 20 एप्रिल रोजी चुनाभट्टी येथील किशोर जनार्दन मुनगेकर (वय 34) यांच्या शरिराला छिन्नविछिन्न अवस्थेत करुन त्यांचा मृतदेह विरार पुर्वेकडील कांडोलपाडा गावच्या हाद्दीत डोंगरावर फेकून दिला होता.

त्यांच्याजवळील महिंद्रा कंपनीची पांढर्‍या रंगाची झायलो गाडी घेवून हे चोरटे फ़रार झाले होते. याचा विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या दोन्ही गुन्ह्यांच्या तपास चालू आहे. तोपर्यंत नालासोपारा येथे राहणारे प्रकाश दत्ताराम कडू (वय 40) यांचा मृतदेह पाच डिसेंबर रोजी भिवंडी पोलीस ठाणे हद्दीत सापडल्याने एकच खळबळ माजली होती. यांच्याजवळील इनोव्हा कार घेवून हे चोरटे फ़रार झाले होते. याचाही गुन्हा भिवंडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. वालिव पोलिसांनी या क्रुरकर्मा चार अरोपिंना अटक करुन त्यांच्याकडुन तीन गाड्याही जप्त केल्या आहेत.

इनोव्हा, झायलो, टोयोटा गाडीची चोरी, चालकाचा निर्घृणपणे खून या होणार्‍या गुन्ह्यांने पोलीस प्रशासनासह वाहनधारकात एकच खळबळ माजली होती. यावरुन पालघर पोलिसांनी याची चौकशी केली असता. या टोळीचा पर्दाफ़ाश झाला. या सराईत चोरांच्या टोळीच्या गुन्हेगारी कारवायांनी या तिघांसह अन्य कुणाकुणाचा हात आहे याचा पोलीस तपास करीत आहेत. परंतु या चोरांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी मयत प्रकाश कडू यांच्या पत्नीने केली आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 2, 2015 06:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...