विधानसभा निडणुकीची घोषणा लवकरच

18 ऑगस्ट राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. 8 आणि 10 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान घेतलं जाईल, अशी खात्रीलायक माहिती आहे. 3 नोव्हेंबरपूर्वी राज्यात नवीन सरकारही अस्तित्वात येईल. त्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी घेतला. यावेळी राज्याच्या मतदारांची अंतिम यादी 22 ऑगस्टला पूर्ण होईल अशी माहीती नवीन चावला यांनी मुंबईत दिली होती. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 25 किंवा 27 ऑगस्टला राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. ठरल्या वेळेनुसार निवडणुका व्हाव्यात, अशी इच्छा सत्ताधार्‍यांनी निवडणूक आयोगाकडे मांडली आहे. राज्यातल्या निवडणुका 2 टप्प्यात होणार आहेत. त्यानुसार 8 आणि 10 ऑक्टोबर या दोन दिवशी मतदान पार पडण्याची शक्यता आहे. ठरल्यावेळेनुसारच निवडणुका घ्याव्यात असा आग्रह विरोधकांनी धरला आहे. कुठल्याही परिस्थितीत येत्या तीन नोव्हेंबरपूर्वी राज्यात नवीन सरकार अस्तित्वात यायला हवं. त्यामुळे निवडणुका वेळेवरच घ्यायला हव्यात असा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2009 09:29 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2009 09:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...