वर्षाच्या पहिल्या दिवशी अवकाळी पाऊस

वर्षाच्या पहिल्या दिवशी अवकाळी पाऊस

  • Share this:

paus

01 जानेवारी : नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील बहुतेक जिल्ह्यांसमोर अवकाळी पावसाचं संकट उभं राहिलं आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबादसह विदर्भातील बुलडाणा, अमरावती, अकोला, जळगाव, भुसावळ, नागपुरातही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तर अकोल्यातील बाळापूरमध्ये गारपीट झालीय. यामुळे रब्बी पिकांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. तर दुसरीकडे कोकणातील सिंधुदुर्ग, कणकवली आणि सावंतवाडीतही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. पाऊस पडायचा थांबला असला तरी या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकांवर चांगलाचं परिणाम होणार आहे.

2014 मध्येही अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी ग्रस्त झाला होता. मात्र आता 2015 च्या सुरुवातीलाही शेतकर्‍याला निसर्गाच्या दुष्टचक्रातून दिलासा मिळालेला नाही. अचानक आलेल्या पावसाने वातावरणात गारठा वाढला आहे. यामुळे गेल्या काही दिवासांपासून खालावलेला पारा आणखीच खाली गेला आहे. दरम्यान अवकाळी पावसाचं नेमकं कारण मात्र अजून समजू शकलेलं नाही.

Follow @ibnlokmattv

First published: January 1, 2015, 11:18 AM IST

ताज्या बातम्या