राज्यात 2 कोटी 78 लाख कार्डधारकांना 55 रुपये प्रति किलोने तूरडाळ

15 ऑगस्टराज्यातल्या 2 कोटी 78 लाख रेशन कार्डधारकंाना 55 रुपये प्रति किलोने तुरडाळ वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज मुंबईत केला. बाजारात सध्या तुरडाळीचे भाव कडाडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला माफक दरात तुरडाळ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने तुरडाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत या स्वस्त तुरडाळ वाटपाला आज सुरुवात झाली. तर राज्यातल्या इतर भागात 20 ऑगस्टपासुन सर्व रेशनिंग दुकानावर 55 रुपये दराने तुरडाळ उपलब्ध होणार आहे. तसेच खुल्या बाजारात तुरडाळीचा साठा उपलव्ध व्हावा, यासाठी साठेबाजांवर कठोर कारवाई केली जात आहे. अशी माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Aug 15, 2009 02:28 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 15, 2009 02:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...