30 डिसेंबर :एअर एशियाच्या बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष सुमात्राच्या पूर्व किनारपट्टीजवळील समुद्रात आढळले असून विमानातील 40 प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत.
इंडोनेशियातील सुराबायाहून सिंगापूरला निघालेले एअर एशियाचे QZ 8501हे विमान रविवारी सकाळी बेपत्ता झाले होते. विमानाच्या शोध मोहिमेदरम्यान, मंगळवारी आप्तकालीन तसेच मुख्य दरवाजाचे काही अवशेष समुद्रात सापडले, अशी माहिती इंडोनेशियन अधिकार्यांनी दिली आहे. तसेच समुद्रात लाईफ जॅकेट्स दिसल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे बेपत्ता झालेल्या या विमानाला येथेच जलसमाधी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी सकाळी बेपत्ता झालेल्या या समुद्रात 155 प्रवासी आणि 7 कर्मचारी असे 162 जण होते.