कॅप्टन महेंद्रसिंग धोणीचा टेस्ट क्रिकेटला अलविदा

कॅप्टन महेंद्रसिंग धोणीचा टेस्ट क्रिकेटला अलविदा

  • Share this:

Dhoni

30 डिसेंबर  : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोणीने आज (मंगळवारी) टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय 'बीसीसीआय'ला कळवला आहे. धोणीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त होत आहे.

धोनीने आपला निर्णय बीसीसीआयला कळवल्यानंतर बीसीसाआयने ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली. धोणीने आत्तापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत 90 टेस्ट मॅच खेळले असून त्यामध्ये 4876 रन्स केले आहेत. यामध्ये 6 सेंच्युरी आणि 33 हाफसेंच्युरीचा समावेश आहे. आगामी काळात तो वन डे आणि टी-20 मॅचचं खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी येथील चौथ्या कसोटीतील शेवटची टेस्ट अजून बाकी असतानाच धोनीने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे. तसेच धोनीचा निर्णय त्वरित लागू होणार असून ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पुढील टेस्ट मॅचचे नेतृत्त्व विराट कोहली करणार असल्याचेही बीसीसीआयने ट्विट केले आहे.

धोणीची टेस्टमधली कारकीर्द :

  • 90 टेस्टमध्ये 4876 रन्स
  • 90 टेस्ट मध्ये 144 इनिंग्ज खेळल्या
  • 6 सेंच्युरी, 33 हाफसेंच्युरी
  • 256 कॅच आणि 38 स्टम्पिंग

धोणीच्या टेस्ट कॅप्टन्सीमध्ये 60 मॅच खेळल्या गेल्या :

  • यातल्या 27 टेस्ट आपण जिंकल्या
  • 18 टेस्टमध्ये पराभव झाला
  • तर 15 टेस्ट ड्रॉ झाल्या

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2014 06:47 PM IST

ताज्या बातम्या