मेलबर्न टेस्ट ड्रा करण्यात टीम इंडियाला यश

 मेलबर्न टेस्ट ड्रा करण्यात टीम इंडियाला यश

  • Share this:

Melbourn Test

30 डिसेंबर  : मेलबर्न टेस्ट ड्रा करण्यात अखेर टीम इंडियाला यश आले आहे. धोनी आणि अश्विन यांच्या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाला कसोटी अनिर्णित राखण्यात यश आले आहे. मात्र, या निकालानंतर ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने खिशात घातली आहे.

कसोटीच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 384 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरूवात निराशाजनक झाली. शिखर धवन शुन्यावर बाद झाला त्यापाठोपाठ लोकेश राहुल अवघी एका रनवर बाद झाला. तर, पहिल्या डावात अर्धशतक झळकावणारा मुरली विजयही 11 धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था बिकट झाली होती.

मात्र, त्यानंतर कोहली आणि रहाणेने भारताचा डाव काहीसा सावरत संघाला 100 धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र, त्यानंतर विराट कोहली 54 धावांवर बाद झाला. त्यामुळे मागील दोन कसोट्यांप्रमाणे भारत पुन्हा पराभवाचा कित्ता गिरवणार असेच चित्र निर्माण झाले होते. चेतेश्वर पुजाराही 21 धावांवर माघारी परतला. अजिंक्य रहाणे संयमी खेळी करत असतानाच तो 48 धावांवर बाद झाला. अखेर कर्णधार धोनीने आर. अश्विच्या साथीने किल्ला लढवत मेलबर्न टेस्ट ड्रा करण्यात टीम इंडियाला यश आले आहे.

Follow @ibnlokmattv

First published: December 30, 2014, 1:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading