News18 Lokmat

जमीन अधिग्रहण सुधारणा अध्यादेशाला मंत्रिमंडळाची मंजुरी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Dec 29, 2014 08:54 PM IST

jaitley4_0_0_0_0_0

29 डिसेंबर  : जमीन अधिग्रहण कायद्यातील जाचक ठरणारे नियम शिथिल करण्यासाठी या कायद्यात सुधारणा करणार्‍या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यादेशाला मंजुरी देण्यात आल्याचे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, या सुधारणांमुळे जमीन अधिग्रहीत केलेल्यांना मिळणार्‍या परताव्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असेही जेटली यांनी स्पष्ट केले. तसेच जमीन अधिग्रहण करताना शेतकर्‍याच्या आणि समाजाच्या विकासाची गरज असल्याने, या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या अध्यादेशामुळे ऊर्जा, गृह आणि संरक्षण या क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती मिळणार असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 29, 2014 08:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...