एअर एशियाचे बेपत्ता झालेलं विमान समुद्रात बुडालं?

एअर एशियाचे बेपत्ता झालेलं विमान समुद्रात बुडालं?

  • Share this:

AirAsia QZ8501

29 डिसेंबर  : इंडोनेशियाहून सिंगापूरकडे निघालेलं एअर एशियाचं विमान बुडाल्याची शक्याता आणखीण दाट झाली आहे. शोध मोहिमेदरम्यान बेपत्ता एअर एशिया विमानाचे काही अवशेष सापडल्याची माहिती इंडोनेशियन अधिकार्‍यांनी दिली आहे.

एअर एशियाचे बेपत्ता झालेले विमान इंडोनेशियातील समुद्रात कोसळल्याची शक्यता आज सकाळी व्यक्त करण्यात आली होती आहे. विमाना शोधण्यासाठी आज (सोमवारी) सकाळी अंधार कमी होताच पुन्हा शोधमोहिमेला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियन जहाजाला शोध मोहिमेदरम्यान समुद्रात विमानाचे काही संशयास्पद अवशेष मिळाल्याची माहिती इंडोनेशियाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर विमान समुद्रात बुडाल्याचा अंदाज इंडोनेशियन अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

रडार आणि अन्य माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे विमान समुद्र तळाशी असावे असेही त्यांनी म्हटलंआहे.

इंडोनेशियातील सुराबायाहून सिंगापूरला निघालेले एअर एशियाचे QZ 8501 हे विमान रविवारी सकाळी बेपत्ता झाले आहे. या विमानात 155 प्रवासी आणि सात कर्मचारी असे एकून 162 जण आहेत. 24 तासांचा कालावधी लोटला तरी या विमानाचा अद्याप थांगपत्ता लागू शकलेला नाही. शोध मोहीम राबवणारे बंबांग सोलीस्ट्यो यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे विमान कोसळण्याचे ठिकाण समुद्र असावे. पण हा प्राथमिक अंदाज असून अजूनही विमानाची शोधमोहीम सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, सोमवारी सकाळी पुन्हा एकदा विमानाच्या शोधमोहीमेला सुरुवात झाली. इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया आणि ऑस्ट्रेलिया हे देश शोधमोहीमेत सहभागी झाले आहेत. मात्र खराब हवामानामुळे शोधमोहीमेत अडथळे येत आहेत. गेल्या वर्षभरात मलेशियाच्या विमानांच्या तीन मोठ्या दुर्घटना झाल्या आहे. कालच्या घटनेनंतर एअर एशियाचे शेअर्स 7 टक्क्यांनी घसरलेत.

Follow @ibnlokmattv

First published: December 29, 2014, 5:58 PM IST

ताज्या बातम्या